पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते रविवारी उत्तूर येथे होणार सन्मान सोहळा
प्रतिष्ठानचे अध्यक्ष भैरू सावंत आणि सुरेश शिंत्रे यांची माहिती
आजरा (प्रतिनिधी): उत्तूर येथील लोकशाहीर द. ना. गव्हाणकर प्रतिष्ठाण यांच्यावतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील गुणिजनांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यावर्षी हा सोहळा रविवारी ११ मे रोजी उत्तूर येथे होत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पुरस्कारकर्त्यांचा सन्मान होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भैरू सावंत आणि सुरेश शिंत्रे यांनी दिली.
साहित्य, कला, शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. रविकांत शर्मा, डॉ. जितेंद्र लोखंडे, महादेव मिसाळ, दत्तात्रय खवरे, दत्तात्रय देसाई, निवृत्ती कांबळे, प्रकाश नावलकर, शुभांगी आमणगी, मनीषा गुरव, मालती सासुलकर, कैकशा पठाण, दत्तात्रय तळेकर, विनायक आमणगी, पांडुरंग धामणकर, सागर उत्तूरकर, बाबासाहेब पन्हाळकर यांच्यासह संत बाळूमामा भजनी मंडळ सरवडे या १७ जणांचा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. येथील महादेव मंदिर येथे सकाळी ११ वाजता कार्यक्रम होणार आहे. यावेळी आयएएस वृषाली कांबळे, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, सरपंच किरण आमणगी, विलास पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.