प्रशालेचा निकाल शंभर टक्के ; पालक वर्गातून समाधान
गडहिंग्लज (प्रतिनिधी ) : येथील साधना हायस्कूलचा दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला. यामध्ये अतिका यळगुद्रे हिने 94 टक्के गुण मिळून प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला, तर तनिष्का पाटील हिने 93.60 टक्के द्वितीय, श्रेया राणे 90.80 टक्के तृतीय, सुभान याकूम शहा 90 टक्के चौथा, अलिशा बुडेखान 89.80 टक्के हिने पाचवा क्रमांक पटकावला.
दरम्यान, दहावीतल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा साधना हायस्कूलमध्ये सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव जे. बी. बारदेस्कर होते. स्वागत प्राचार्य आय. पी. कुटीनो यांनी केले. व्होकेशनल विभाग प्रमुख ए. जी. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या परीक्षेत 51 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, प्रथम श्रेणीत 88 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावेळी यशस्वी विद्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन श्री. जोसेफ, एन. डी. शेख यांनी केले. आभार शितल हरळीकर यांनी मानले.
विद्यार्थ्यांना संस्था अध्यक्ष चंद्रकांत गुजर, संचालिका सौ. फिलॉन बारदेस्कर, पर्यवेक्षक अरविंद बारदेस्कर, शिक्षक व कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.