Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वेशभूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

राजमाता अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजन 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा यांच्यावतीने राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त गडहिंग्लज येथे भव्य वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेला गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातून मोठ्या संख्येने स्पर्धक  सहभागी झाले होते.



या कार्यक्रमास आमदार शिवाजीराव पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तारळे, युवा मोर्चा अध्यक्ष धीरज करलकर, गडहिंग्लज मंडळ अध्यक्ष प्रीतम कापसे, नेसरी मंडळ अध्यक्ष विजय पाटील, सौ. भारती जाधव, तालुका उपाध्यक्ष सुभाष चोथे, बाजार समितीचे उपाध्यक्ष रवींद्र शेंडुरे, ग्रामपंचायत सदस्य रविशंकर बंदी, गणपतराव पट्टणकुडी, संपदा चव्हाण, अविनाश दुध्यागोळ, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमर व्हसकोटी, तालुका उपाध्यक्ष आशिष किणकर, भीमा दुंडगे, अजित जामदार, चंद्रकांत धनवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.



प्रारंभी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष धीरज करलकर यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक अविनाश दुध्यागोळ यांनी केले. यावेळी अजित जामदार यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेतील विजेत्यांना आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस वितरण करण्यात आले. भारती जाधव यांच्या हस्ते भडगाव गावातील विशेष कामगिरी केलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला.



या स्पर्धेत लहान गटात आरुषी संदीप बंदी, प्राची शशिकांत चौगुले, अनुजा सिद्धाप्पा पुजारी, कृतिका कल्लाप्पा पुजारी, श्रावणी सुरेश चोथे, ऋतिका  महांतेश भुसूरी. मोठ्या गटात हेमा शिवरुद्र दोडके, गायत्री देवाप्पा पुजारी, राणी संजय खोत, सुरेखा शिवराज कोरी.  स्पर्धेचे परीक्षक म्हणून रंजना हसुरे, वैशाली जाधव, रेखा नाईक यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे आयोजन निलेश कोरी, विनायक शिंत्रे, आकाश कित्तुरकर, महादेव खमलेट्टी, विशाल कोरी, अमर चिनगुडे, शिवा पट्टणकुडी, अनिल बिरंजे, अभिषेक पाटील, सौरभ कोरी, सागर गोरुले, धीरज रेगडे, भूषण रेगडे, अनिल कोरी, सुहास पाटील, संदीप चौगुले, देवराज धनवडे, नागेश भुसूरी यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी व भडगाव ग्रामस्थांनी केले. या कार्यक्रमासाठी भडगाव चे पोलीस पाटील उदय पुजारी, विठ्ठल पुजारी, शंकर पुजारी व धनगर समाजाचे विशेष सहकार्य लाभले.या कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे आभार युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस नितेश कोरी यांनी मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.