Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आजऱ्यात डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कुल व जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी केली पाण्याची सोय

अंजुमन इत्तेहादुल इस्लामने खोदली कुपनलिका 




आजरा (प्रतिनिधी): येथील डॉ. झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज येथे विद्यार्थ्यांना पाण्याची कामतरता भासत होती. प्रसाधन गृह व स्वच्छतागृहात पाण्याआभावी विद्यार्थ्यांची अडचण होत होती. विद्यार्थ्यांची ही गरज लक्षात घेऊन अंजुमनचे नूतन अध्यक्ष हाजी आलमभाई नाईकवाडे यांनी हायस्कुलच्या आवारात कुपनलिका खोदण्याचा प्रस्ताव मांडला, यावर सर्वांनी सहमती दर्शवली त्यानुसार आज हायस्कुलच्या आवारात कुपनलिका खोदण्यात आली.

       



सार्वजनिक  पाण्याचा अनियमित पुरवठा असल्यामुळे शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींना स्वच्छतागृहात व प्रसाधनगृहात पाण्यासाठी अडचण निर्माण होत होती. शाळेच्या गरजा आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी विचारात घेऊन हायस्कुलच्या आवारात कुपनलिका (बोअर )मारणे गरजेचे असल्याचे नूतन अध्यक्ष हाजी आलमभाई नाईकवाडे यांच्या लक्षात आले. ही बाब त्यांनी आपल्या सहकाऱ्यासमोर मांडली. सहकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला होकार दिला. त्यानुसार अंजुमन इत्तेहादुल इस्लामच्या वतीने ही कुपनलिका खोदण्यात आली.



यावेळी हाजी आलमभाई म्हणाले, विद्यार्थ्यांची गरज पाहून आज आम्ही येथे बोअर मारत आहोत. सर्वांच्या सहकार्याने समाजाभीमुख तसेच समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी काम करणार असून त्याचीच ही सुरवात आहे. अजून भरपूर काही करायचे असल्याबद्दल त्यांनी यावेळी सांगितले.




यावेळी उपाध्यक्ष शौकत लाडजी, सेक्रेटरी हुसेन दरवाजकर, खजिनदार अष्कर लष्करे, शरीफ खेडेकर, नौशादभाई बुडडेखान, बशीर शिडवणकर, सत्तार ढालाईत, कैयुम बुडडेखान, अब्दुलअजीज दरवाजकर, रियाज तकीलदार, इरफान लाडजी, सुलेमान दरवाजकर, रशीद इंचनाळकर, अबुलास दरवाजकर, जावेद दीडबाग, रशीद पठाण यांच्यासह सर्व विश्वस्त तसेच इतर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.