'आजरा (प्रतिनिधी): आज दुपारी आजऱ्यामध्ये अवकाळी पावसाने झोडपले. अंदाजे अर्धा तास पावसाने हजेरी लावल्यामुळे गटारी भरून रस्त्यावर पाणी आले होते. गटारी साफ न केल्यामुळे तसेच काही ठिकाणी गटारीचे काम पूर्ण न झाल्यामुळे पावसाचे पाणी घरासमोर साचले होते.
गुढी पडव्यानंतर भारतीय नवीन वर्षाची सुरवात होते. चैत्राची पालवी सुरु होउन निसर्ग आपली कात टाकून झाडांना गर्द पालवी सुरु होते. शेतकरी राजा आपल्या शेतीची पूर्व मशागत सुरु करतो. नांगरणी, कुळवणी अशा शेतीची मशागतीच्या कामाना सुरवात होते आणि बळीराजा आपली शेती मृगासाठी ब तयार करून ठेवतो . या वाळवामुळे ऊस पिकाला जोम येणार. ऊसपिकाला हे वळीव एका नायट्रोजन खताच्या डोसाचं काम करणार आणि ऊस पीकाची चांगली वाढ होणार.
यंदा वळवाची सुरवात मात्र चांगली झाली आहे. सकाळ पासून उन्हाची तिव्रता वाढली होती.उष्मा वाढल्याने उष्म्यामुळे लोक हैराण झाले होते. अचानक गडगडाट होऊन पाउस झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला आणि वातावरण थंड होऊन गारवा निर्माण झाला . बालचमुनी या पर्वणीचा आनंद लुटत भिजून नाचू लागली. गटारी तुडुंब भरल्या आहेत. वाऱ्यामुळे काहींची पत्रे उडाली.भारत नगर मध्ये गटारींचा प्रश्न ऐरणीवर आहे. गटारीतील पाण्याचा निचरा न झाल्यामुळे लोकांच्या घरासमोर व परड्यात पाणी शिरले तर रस्त्यावर बसलेल्या विक्रेत्यांची तारांबळ उडाली.



