'रमजान'निमित्त दादा जे. एम. ग्रुपच्या वतीने लक्षवेधी रोषणाई
छायाचित्र : मज्जिद किल्लेदार
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज शहरात पवित्र रमजान महिन्यानिमित्त येतील दादा जे. एम. ग्रुपच्या वतीने शहरातील सुन्नी मुस्लिम जमियत मस्जिदीच्या परिसरात मुसळे कॉर्नर ते वीरशैव चौकापर्यंत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग उजळून निघाला आहे. नेहमी गजबजलेले असणाऱ्या या मुख्यमार्गावरच आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने गडहिंग्लज शहराच्या सौंदर्यात देखील भर पडली आहे. ही आकर्षक विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.