नौकुड येथील बंडू चव्हाण व पांडुरंग चव्हाण यांच्याकडून नियोजन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): सामानगडावरील भिमशाप्पा मठात अमावस्या निमित्त उद्या दिनांक २९ मार्च रोजी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. सदर महाप्रसादाचे नियोजन नौकुड येथील सदभक्त बंडू बाबू चव्हाण व पांडुरंग बाबू चव्हाण यांच्याकडून करण्यात आले आहे. महाप्रसाद सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. तरी त्याचा लाभ पंचक्रोशीतील भक्तांनी घ्यावा असे आवाहन चव्हाण बंधू व मठातर्फे भिमशाप्पा दिवटी यांनी केले आहे.

