Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भारत नगरच्या पायाभूत सुविधा पुरवा नाहीतर "संघर्ष मोर्चा "अटळ : कॉ. संग्राम सावंत

गेल्या 27 वर्षापासून भारत नगर पायाभूत सुविधापासून वंचित




आजरा (प्रतिनिधी): गेल्या 27 वर्षापासून भारत नगर पायाभूत व प्राथमिक सुविधापासून वंचित आहे. काल परवा तयार झालेल्या कॉलनीमध्ये रस्ते, गटारी, दिवाबत्ती यासारख्या सुविधा पुरवल्या जात आहेत परंतु भारत नगरमधील नागरिक निवेदने देऊन, आंदोलन करून सुद्धा प्रशासन त्यांच्या पायाभूत गरजाकडे दुर्लक्ष का करीत आहे हे गूढ अनाकलनीय आहे असे तेथील रहिवाशांचे म्हणणे आहे. भारतीय संविधानाच्या कलम 243W मध्ये स्थानिक संस्थांच्या अधिकार आणि कर्तव्याबद्दल सांगितले आहे.  नगरपंचायतीनी स्थानिक पातळीवर विविध सेवांचा पुरवठा करणे आवश्यक असताना सुद्धा नगरपंचायत प्रशासन याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याबाबत सांगण्यात येत आहे. मुक्ती संघर्ष समितीने दि. 24 फेब्रुवारी 3मार्च रोजी दिलेल्या निवेदनातील मागण्याबाबत ताबडतोब कार्यवाही व अंमलबजावणी न झालेस पुन्हा "संघर्ष मोर्चा "काढून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा नगरपंचायत, तहसीलदार, बांधकाम विभाग, विज वितरण व उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.




आरोग्य व आरोग्यविषयक सेवासाठी कलम 252(2)महाराष्ट्र नगरपरिषद कायद्यानुसार नगरपंचायतीनी नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवणे व आवश्यक सुविधा देणेबाबतचा अधिकार प्राप्त आहे. परंतु मागील 27वर्षापासून भारत नगरमधील नागरिक रस्ते, गटर, पथदिवे इ. पायाभूत सुविधापासून वंचित आहेत. यासाठी भारत नगरमधील नागरिकांनी  वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. परंतु हल्ली तयार झालेल्या कॉलनीना नगर पंचायत सुविधा पुरवीत आहे. भारत नगर मात्र यापासून वंचित आहे. दि. 3 मार्च 2025 रोजी नगरपंचायत, बांधकाम विभाग, विज वितरण, पोलीस प्रशासन यांच्या समवेत भारत नगरच्या रहिवास्यांची मुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वात बैठक झाली यामध्ये सकारात्मक निर्णय झाले परंतु सदर सभेचा इतिवृत्तांत नगरपंचायतीने आज अखेर दिलेला नाही की कोणतीही कार्यवाही केलेली नाही. प्राधान्य क्रमाने भारत नगर मधील रस्ते, गटारी इ. कामे करण्याबाबत ठरले असताना सुद्धा आज अखेर कोणतेही ठोस निर्णय झालेले नाही. त्यामुळे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून भारत नगर मधील वासाहतीत राहणाऱ्या लोकांना न्याय द्यावा अन्यथा "संघर्ष मोर्चा "काढून आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.




निवेदनावर मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष कॉ. संग्राम सावंत, जिल्हासंघटक समीर खेडेकर, तालुका संघटक मजीद मुल्ला, सलाउद्दीन शेख, वाहिद सोनेखान, सलीम शेख, तौफिक माणगांवकर, तोहीद माणगांवकर, खुद्बुद्दीन तगारे, गुलाब शिकलगार, सलीम नाईकवाडे, मुदस्सर इंचानळकर, यासिन सैय्यद, शौकत पठाण, महम्मद नसरदी, रहुफ नसरदी, सलीम ढालाईत, कासीम लतीफ, मुफिद काकतिकर, रशीद लाडजी, असिफ काकतिकर, मुबारक नसरदी आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.