Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विद्या मंदिर बुगडीकट्टे शाळेस माजी विद्यार्थ्यांकडून स्पोर्ट्स किट प्रदान

1996 -97 सालच्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम


पंधरा हजार रुपये किमतीचे किट शाळेकडे सुपूर्द  




गडहिंग्लज (प्रतिनिधी):
विद्या मंदिर बुगडीकट्टे शाळेस 1996-97 बॅचच्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी भेट स्वरूपात  स्पोर्ट्स किट प्रदान केले. सदर किट हे पंधरा हजार रुपये किमतीचे आहे. यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींना खेळासाठी लागणाऱ्या ड्रेस संचचा  समावेश आहे. या शाळेच्या शैक्षणिक उठावात माजी विद्यार्थ्यांचे मोठे योगदान आहे.



या शाळेचे माजी विद्यार्थी मायापा धनगर, कामाना नाईक, इरापा हुगाई, अजित देसाई, अण्णासो देसाई, उत्तम केसरकर, गुंडू बाळकर, पांडुरंग मुंगुरवाडे, संतोष कुणके, नितीन पाटील, काशिनाथ देसाई, कऱ्यापा हुदली हे सर्व वर्गमित्र वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत.




आपण ज्या शाळेत घडलो, त्या शाळेच्या ऋणातुन उतराई व्हावे या हेतूने या शाळेची गरज लक्षात घेऊन दि.1 जानेवारी रोजी सदर किटचे वाटप करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांची शाळेसाठी सुरू असलेली ही धडपड निश्चितच कौतुकास्पद आहे.



प्रारंभी मुख्याध्यापक सुनिल यादव यांनी प्रास्तविक केले. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती जपलेला ऋणानुबंध कौतुक करण्यासारखे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिक्षक कामाना नाईक, उपसरपंच मायाप्पा धनगर यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.



कार्यक्रमास  प्रकाश कुंभार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. यल्लव्वा हुगाई यांच्यासह शिक्षक, सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.