महागाव येथील 'संत गजानन' नर्सिंग मध्ये शपथविधी सोहळा उत्साहात
गडहिंग्लज (प्रतिनिधी): वैद्यकीय क्षेत्रात पुस्तकी ज्ञानाबरोबरच हॉस्पिटलमधील प्रात्यक्षिक अनुभव महत्त्वाचा असतो. या अनुभवातून मिळालेले ज्ञान हे शाश्वत टिकणारे असते. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून कितीही अडचणी, समस्या आल्या तरी सेवा हीच आद्यकर्तव्य मानून अविरत कार्य करीत असणारे डॉक्टर आणि परिचारक या आरोग्यसेवेतील महत्त्वाचे कणा आहेत. येथील हॉस्पिटलने आधुनिक नवनवीन तंत्रज्ञान व शिक्षणातून सक्षम परिचारिका घडवण्याचे कार्य उत्कृष्टपणे करत असल्याचे गौरवोद्गार गडहिंग्लज येथील भुलतज्ञ डॉ. प्रशांत कोरे यांनी काढले.
महागाव (ता. गडहिंग्लज ) येथील संत गजानन महाराज नर्सिंग महाविद्यालयात आयोजित नवागत विद्यार्थ्यांसाठी शपथविधी व दीपप्रज्वलन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापुजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्राचार्य गजानन हतरोटी यानी सर्व मान्यवरांचे स्वागत करून आद्यपरिचारिका फ्लोरेंन्स नाइटिंगेंल यांचा इतिहास आणि कार्याबद्दल माहिती देऊन कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. यावेळी नवागत प्रथम वर्षातील ए.एन एम. , जी. एन. एम व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. यावेळी काही विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगत व्यक्त करुन येथील सोयी सुविधाची माहिती दिली.
कार्यक्रमास प्राचार्या सुजाता हरेर, स्टेफी करविनकोप्पा, विठ्ठल वडर, कविता जाधव यांच्यासह अन्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते प्रा. शिवकुमार कोरे यांनी आभार मानले.
बातमीचे व्हिडिओ येथे पहा 👇