गडहिंग्लज (प्रतिनिधी): निलजी येथील ग्रामदैवत श्री हनुमान यात्रा गुरुवार (दि.६)पासून सोमवार (दि.१०पर्यंत) होणार आहे यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक, विविध स्पर्धा, प्रवचन व महाप्रसाद असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यात्रेनिमित्य मंदिर व परिसरात केलेल्या आकर्षक विद्युतरोषणाईने परिसर उजळून निघाला आहे.
गुरुवार (दि.६) रोजी हनुमान जन्मकाळ व अक्कमहादेवी जयंती सोहळा, सकाळी धावणे, श्वान स्पर्धा, संध्याकाळी पगडी पट्टस्पर्धा होतील. यातील विजेत्यांना २१००१, १५००१, १०००१, ५००१ व प्रत्येकी ढाल असे बक्षीस आहेत. शुक्रवार (दि.७) रोजी नूल मठाचे गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीच्या मार्गदर्शनाखाली सिद्धेश्वर महास्वामी (खानापूर), गुरुसिद्धेश्वर महास्वामी (हत्तरगी)व प्रवचनकार मारुती शरणरु यांचा प्रवचन व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. शनिवार( दि.८ )रोजी शृंगार पूजा, पाणी भरणे, सायंकाळी खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा होतील. यातील विजेत्यांना १०००१, ७००१, ५००१, १५०१ व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. रविवार (दि.९) रोजी ट्रॅक्टर डम्पिंग रिव्हर्स स्पर्धा, श्रीना दंडवत आणि आंबिल आणने महाप्रसाद व रात्री हिंदी मराठी गाण्यावर आधारित आर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे.
सोमवार (दि.१०) यात्रेचा मुख्य दिवस. पहाटे मूर्तीस अभिषेक व पूजा व महाआरती, गावातून सवाद्य पालखी मिरवणूक. दरम्यान सकाळी हातात बैल घेऊन पळणे, बैल व घोडा गाडी स्पर्धेसाठी १५००१, १०००१, ७००१, जनरल घोडा गाडीसाठी १०००१, ७००१, ५००१, टांगा गाडीसाठी ५००१, ३००१, २००१, नवतरंग घोडा गाडी साठी ५००१, ३००१, २००१ बक्षिसे आहेत.
दुपारी कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यातील नामवंत मल्लांच्या कुस्त्या तसेच मेंढ्यांच्या टक्करीचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री 'ग्रामपंचायत गंगव्वा' हा कन्नड मनोरंजनात्मक नाटक होणार असून सर्व कार्यक्रमासाठी सदभक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आला आहे.



