बहुराष्ट्रीय कंपन्याच्या मुलाखती
वैष्णवी कुंभार हिची सर्वाधिक वेतनावर नियुक्ती
![]() |
| महागाव : विविध कंपनीत निवड झालेल्या संत गजानन पॉलिटेक्निक मधील विद्यार्थ्यांसमवेत प्राचार्य डी. बी. केस्ती, प्रा. संतोष गुरव, प्रा. आर. एस. पाटील व इतर शिक्षक. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव (ता.गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निक मध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये चौदा वेगवेगळ्या राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कॅम्पस मुलाखतीतून ३५४ विद्यार्थ्यांची निवड झाली असून यामध्ये संत गजानन चे १७८ तर इतर पॉलिटेक्निक मधून १७६ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे संत गजानन पॉलीटेक्निकची वैष्णवी कुंभार या विद्यार्थिनीचा मुंबईतील शिनाईडर इलेक्ट्रिक या बहुराष्ट्रीय कंपनीसाठी यावर्षीच्या सर्वाधिक ३.७५ लाख वार्षिक वेतनावर निवड असल्याची माहिती प्राचार्य डी.बी.केस्ती यांनी पत्रकारांना दिली.
या वर्षीच्या दुसऱ्या सत्रातील फेब्रुवारी व मार्च महिन्यात कॅम्पस मुलाखतीचे आयोजिन केले होते यातून जॉन डीअर इंडिया पुणे (१०६), टाटा मोटर्स पुणे (९२),मॕग्ना ऑटोमॅटिव्ह इंडिया पुणे (५५), कमिन्स इंडिया पुणे( ६९ ),के.एस.पी.जी. ऑटोमॅटिव्ह पुणे (१८), बजाज ऑटो (१३),शिनाईडर इलेक्ट्रिक मुंबई (१) तसेच एक्स फोर्स कंझूमर बेळगाव यांची नुकताच मुलाखती झाल्या आहेत.
कॅम्पस मुलाखतीमध्ये पश्चिम महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या या पॉलिटेक्निक मध्ये ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांना मुलाखती आगोदरच तज्ञाची व्याख्याने, कंपनीतील कामाचे स्वरूप, परीक्षा पद्धती, प्रश्नोत्तरे याबाबत विशेष मार्गदर्शन केला जातो. परिणामी विद्यार्थी आत्मविश्वासाने मुलाखतीला सामोरे जाऊन हमखास यश मिळवतात. शिवाय पदविका अभ्यासक्रमातील शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असतानाच नोकरीच्या संधी मिळत असल्याने विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढ हा संत गजानन पॉलिटेक्निककडे जास्त आहे.
तसेच द्वितीय सत्रातील लार्सन अँड टुब्रो लिमिटेड या कंपनीकडून शुक्रवार (दि. ३१)रोजी कॉलेजमध्ये कॅम्पस मुलाखतीचे आयोजन केले आहे. यामध्ये अधिकाधिक भरती होणार असून सर्व पात्र तृतीय वर्षातील इंजिनिअरिंग पदविकेच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन विश्वस्त डॉ. संजय चव्हाण यांनी यावेळी केले.
यावेळी संस्थाध्यक्ष ॲड. आण्णासाहेब चव्हाण, विस्वस्थ डॉ. यशवंत चव्हाण, सचिव ॲड. बाळासाहेब चव्हाण, रजिस्टार शिरीष गणाचार्य, उपप्राचार्या प्रा. आर.एस.पाटील, प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. संतोष गुरव यासह शिक्षक उपस्थित होते.

