गडहिंग्लज न्यु युवा मंचचे पोलीस ठाण्याला निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): ए. एस. ट्रेडर्समध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांची तक्रार घेण्यात यावी अशी मागणी गडहिंग्लज न्यू युवा मंच यांच्यावतीने काशिनाथ गडकरी व तेजस घेवडे यांनी गडहिंग्लज पोलीस ठाण्याकडे निवेदनातून केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, राधानगरी, भुदरगड या परिसरातील असलेले ए.एस. टेडर्स ही कंपनी बघता बघताकोल्हापूर जिल्हयात एजंटांच्या मार्फत गल्लोगल्ली पोचून त्यामध्ये १० टक्केपेक्षा अधिक रक्कमेचे अमिष दाखवून तसेच महिन्याला लागणारे किराणा बाजार, जीवनावश्यक वस्तू अगदी कमी दरात देण्याचे अमिष दाखवले. त्यामुळे अनेक सेवानिवृत्त कर्मचारी, शिक्षक, शेतकरी, डॉक्टर, व्यावसायिक हे लोक मोठया प्रमाणात गुंतवणूक केल्याने गडहिंग्लज शहरासह तालुक्यात ५० ते ७० कोटीची गुंतवणूक झाली आहे. पण आता एजंट कार्यालय, मोबाईल बंद करुन पसार झाले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे.
त्यामुळे गडहिंग्लज शहरासह तालुक्यातील ए.एस. ट्रेडर्समध्ये फसवणूक झालेल्या लोकांच्या तकारी गडहिंग्लज पोलीस ठाण्यात घ्यावी व गुंतवणूकदारांना दिलासा द्यावा अशी मागणी या निवेदनातून केली आहे.

