🔘हार, तुरे, पुष्पगुच्छ,भेट वस्तूंना देणार फाटा
🔘"एक वही.. भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी" हा विधायक उपक्रम राबविण्यात येणार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दिनांक १४ सप्टेंबर रोजी कार्यकर्त्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विद्या संकुलमध्ये सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमास सर्वपक्षीय मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात ॲड. दिग्विजय कुराडे यांना शुभेच्छा देण्यासाठी हार, तुरे, पुष्पगुच्छ व कोणतीही भेट वस्तू न आणता शुभेच्छा प्रती "एक वही.. भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी" हा विधायक उपक्रम राबविण्यात येत आहे. या मेळाव्यामध्ये ॲड. दिग्विजय कुराडे यांच्यावर प्रेम करणारा मित्रपरिवार तसेच विविध मान्यवर कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे. या मेळाव्यास दिग्विजय कुराडे प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम.कदम, संचालक बसवराज आजरी यांनी केले आहे.