🔘हेल्थ कार्ड डेटा ऑनलाईन भरण्यासाठी तपासणी करून घेणे आवश्यकच
🔘लहान मुलांचे देखील हेल्थ कार्ड काढण्यात येणार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी येथील ग्रामस्थांसाठी आरोग्य उपकेंद्रात उद्या २३ रोजी आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. अशी माहिती सरपंच मोसिम मुल्ला यांनी दिली. ही तपासणी करून ग्रामस्थांनी काढलेल्या हेल्थ कार्डची माहिती ऑनलाइन भरली जाणार आहे.
ग्रामस्थांना आरोग्य विभागाकडून हेल्थकार्ड काढून देण्यात आले आहेत. आपली आरोग्य तपासणी करून तो डाटा ऑनलाईन भरणे खूप गरजेचे आहे. तसेच ज्यांनी अजून हेल्थ कार्ड काढले नाहीत त्यांचे तसेच लहान मुलांचे सुद्धा हेल्थ कार्ड काढले जाणार आहेत. यावेळी तीस वर्षावरील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व मोठ्या आजारांची तसेच शुगर तपासणी सुद्धा करण्यात येणार आहे. याचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन सरपंच मोसिम मुल्ला यांनी केले आहे.