Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज लायन्स क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड

गडहिंग्लज : येथे लायन्स क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

गडहिंग्लज( प्रतिनिधी):
लायन्स क्लब गडहिंग्लजच्या सन २०२२-२३ साला करीता नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी प्रसाद सभासद ,सचिवपदी विनायक गळतगे व खजिनदारपदी प्रतीक पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

लायन्स क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ रविवार दि. ३ जुलै रोजी सचिव  सुनील सुतार यांचे हस्ते पार पडला.या पदग्रहण सोहळ्याकरिता माजी प्रांतपाल आण्णासाहेब गळतगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी रिजन चेअरमन राजेंद्र वडगुले , झोन चेअरमन मच्छिन्द्रनाथ सूर्यवंशी , प्रांताचे जी एस टी कोऑर्डिनेटर डॉ. विरेंद्र चिखले , महाराष्ट्र लायनचे संपादक डॉ. प्रा. सर्जेराव पाटील तसेच लायन्स क्लब गडहिंग्लजचे मावळते अध्यक्ष गौरव देशपांडे व  सर्व सभासद उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.