Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नंदनवाडचे जवान अविनाश कागिनकर अनंतात विलीन

नंदनवाड : जवान अविनाश कागिनकर यांच्या पार्थिवाला भडाग्नी देताना वडील आप्पासाहेब. (छाया:मयूर फोटो हलकर्णी)
हलकर्णी  ( वार्ताहर ) :  नंदनवाड ( ता. गडहिंग्लज ) येथील जवान अविनाश आप्पासाहेब कागिनकर यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्यावर येथील  रामलिंग मंदिर शेजारी असणाऱ्या गायरानमध्ये बनविण्यात आलेल्या चौथऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्नी राजलक्ष्मी यांच्यासह जवान अविनाश यांच्या आई-वडिलांनी केलेल्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले.  

नंदनवाड : जवान अविनाश यांचे अंत्यदर्शन घेताना पत्नी राजलक्ष्मी.
 जवान अविनाश कागिनकर धर्मशाला ( हिमाचल प्रदेश ) येथे सैन्यदलात सेवा बजावत होते. रविवार दि. २६ रोजी सकाळी हृदय विकाराने त्यांचे निधन झाले होते. ही बातमी गावात समजताच गावावर शोककळा पसरली. ग्रामस्थांसह नातेवाईक शोकाकुल होते. बुधवारी सकाळी आर्मी सप्लाय कोअर पुणे येथून लष्करी ऍम्ब्युलन्स मधून त्यांचे पार्थिव गावी आणण्यात आले. आई सुवर्णा,वडील आप्पासाहेब, भाऊ वैभव, पत्नी राजलक्ष्मी यांच्यासह नातेवाईकांनी जवान अविनाश यांचे अंत्यदर्शन घेतले. तेथून फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली मधून मिरवणूक काढत रामलिंग मंदिर शेजारी गायरान परिसरात पार्थिव आणण्यात आले. या ठिकाणी बनवण्यात आलेल्या चौथऱ्यावर जवान अविनाश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील आप्पासाहेब यांनी भडाग्नी दिल्यानंतर उपस्थित सर्वांना अश्रू अनावर झाले. शोकाकुल ग्रामस्थांसह नातेवाईकांनी जड अंतकरणाने भारतमातेच्या या सुपुत्राला अखेरचा निरोप दिला. 

नंदनवाड : पुष्पचक्र वाहताना शोकाकुल वडील आप्पासाहेब कागिनकर.
यावेळी माजी.जि.प. सदस्या श्रीमती रेखाताई हतरकी, माजी पं.स.सदस्य बाळेश नाईक, विद्याधर गुरबे, जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे,तहसिलदार दिनेश‌ पारगे, पोलिस उपनिरीक्षक शीतल शिसाळ,जिल्हा सैनिक विभाग कोल्हापूर यांच्या वतीने चंद्रशेखर पांगे, मुख्याध्यापक आनंदा वाघराळकर,स्टेशन कमांडर श्री. राजेंद्रन, सरपंच शेवंता मगदुम,मंडल अधिकारी व्ही.ए.कामत,ग्रामसेवक दत्ता पाटील, तलाठी शिवपुत्र हिरेमठ, रियाजभाई शमनजी यांनी पुष्पचक्र अर्पण केले.
नंदनवाड : जवान अविनाश यांचे पार्थिव घरी अंत्यदर्शनासाठी आणल्यानंतर शोकाकुल नातेवाईकांना पाहून उपस्थितानाही अश्रू अनावर झाले.
यावेळी शोकसभेत तहसीलदार दिनेश पारगे, माजी पंचायत समिती सदस्य बाळेश नाईक,पुष्पा दरेकर यांनी जवान अविनाश यांना श्रद्धांजली वाहिली. एस.बी.पाटील व राजेश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सैन्य दलाच्या जवानांनी पार्थिवावरील राष्ट्रध्वज कागिनकर कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी आजी- माजी सैनिक संघटनेचे कुमार पाटील यांच्यासह उपसरपंच बाबू केसरकर, बसर्गे सरपंच भारती रायमाने, शुक्राचार्य चोथे, बसवराज कापसे, दीपक पुजारी, महाबळेश्वर कापसे,तायगोंडा बोगरनाळ,विस्तार अधिकारी एस.एल.घुले, भिकाजी दळवी यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक,तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.

विविध मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
नंदनवाड : जवान अविनाश कागिनकर यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करताना उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे.
नंदनवाड : जवान अविनाश कागिनकर यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहताना तहसीलदार दिनेश पारगे.
नंदनवाड : जवान अविनाश कागिनकर यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करताना पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक.
नंदनवाड : पुष्पचक्र अर्पण करताना पंचायत समितीचेे माजी सदस्य विद्याधर गुरबे.

नंदनवाड : पुष्पचक्र अर्पण करताना मंडल अधिकारी विजय कामत.

नंदनवाड : पुष्पचक्र अर्पण करताना मुख्याध्यापक आनंदा वाघराळकर.

नंदनवाड : पुष्पचक्र अर्पण करताना तलाठी शिवपुत्र हिरेमठ व ग्रामसेवक दत्ता पाटील.

====जिल्हा सैनिक बोर्डाचे पदाधिकारी====


नंदनवाड : जवान अविनाश कागिनकर यांच्या अंत्ययात्रेत सहभागी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक.



नंदनवाड : ग्रामस्थांनी रांगोळी काढून वाहिलेली श्रद्धांजली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.