![]() |
महागाव : येथील संत गजानन महाराज पॉलिटेक्निक मधील विविध कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत प्राचार्य डी.बी.केस्ती व मार्गदर्शक शिक्षक. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : महागाव ( ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निकमध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये प्रथम सत्रात विविध नामांकित कंपन्यांच्या मुलाखतीतून २४२ विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. यातून १२८ ग्रामीण भागातील मुलींना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
यामध्ये केपीआयटी (३), ओवेंन्स कॉर्नींग (१२),गोल्ड प्लस ग्लास (3), इन्फोसिस ( ६) ,बजाज ऑटो (२७ ), एल ॲड टी (१६) सेहगल ॲटोरायडर्स (२५),प्रिसिजन्स सिल (६३) आर. आर.ग्लोबल (६) वायचळ गृप (६) कमिन्स इंडिया(१७)टाटा मोटर्स (२३)म्याग्रा (१२) स्पायसर इंडिया (२३)या नामांकित कंपनीत सर्वाधिक पॅकेजवर विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या पॉलिटेक्निकच्या 'स्टे इन रुरल प्लेस इन ग्लोबल' या ध्येयाप्रमाणे गेली आठ वर्षामधून ९४ हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या मार्फत चार हजारहून अधिक विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यात यशस्वी झालो आहोत. यापुढेही परदेशी कंपनीबरोबर सामंजस्य करार करून सर्वाधिक विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळवून देणार आहे. तसेच आगामी दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांना दहा ते बारा कंपन्यांच्या मुलाखतीचे आयोजन करून देणारा असल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त डॉ.संजय चव्हाण यांनी सांगितले .
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष ॲड. अण्णासाहेब चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण,सचिव ॲड. बाळासाहेब चव्हाण यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तर प्राचार्य डी. बी. केस्ती,प्लेसमेंट प्रमुख प्रा. संतोष गुरव, रजिस्टर शिरीष गणाचार्य व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.